दहावी इतिहास | प्रकरण २ – इतिहासलेखन : भारतीय परंपरा | Online Test Posted on 12 December 202312 December 2023 By mahendrasfsep दहावी इतिहास प्रकरण २ – इतिहासलेखन : भारतीय परंपरा | Online Test इतिहास लेखन: भारतीय परंपरा 1 / 9 इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी _______ यांनी पुण्यात ७ जुलै १९१० रोजी 'भारत इतिहास संशोधक मंडळा'ची स्थापना केली. (अ) न्या. महादेव गोविंद रानडे (ब) गोविंद सखाराम सरदेसाई (क) स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर (ड) इतिहासाचार्य वि. का. राजवाडे 2 / 9 'प्रिमिटिव्ह कम्युनिझम टु स्लेव्हरी' हे पुस्तक ------- इतिहासलेखनाचे उदाहरण आहे. (मार्च १९) (अ) वसाहतवादी (ब) प्राच्यवादी (क) राष्ट्रवादी (ड) मार्क्सवादी 3 / 9 'स्त्री-पुरुष तुलना' हे _____ यांनी लिहिलेले पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. (अ) मीरा कोसंबी (ब) शर्मिला रेगे (क) ताराबाई शिंदे (ड) पंडिता रमाबाई 4 / 9 महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहासलेखनास ______ यांच्यापासून प्रेरणा मिळाली. (अ) विनायक दामोदर सावरकर (ब) रामकृष्ण गोपाळ भांडारकर (क) विष्णुशास्त्री चिपळूणकर (ड) न्या. महादेव गोविंद रानडे 5 / 9 जेम्स मिल या ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला ______ हा पहिला ग्रंथ होय. (अ) द हिस्टरी ऑफ इंडिया (ब) द हिस्टरी ऑफ द मराठाज् (क) द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया (ड) द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट 6 / 9 इसवी सनाच्या बाराव्या शतकात _____ याने लिहिलेला 'राजतरंगिणी' हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. (अ) बाणभट्ट (ब) कल्हण (क) पतंजली (ड) विशाखदत्त 7 / 9 इसवी सनाच्या सातव्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले _____ हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्रग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. (अ) मेघदूत (ब) राजतरंगिणी (क) रसरत्नाकर (ड) हर्षचरित 8 / 9 'हितोपदेश' या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद _____ यांनी केला. (जुलै १९ - २२) (अ) जेम्स मिल (ब) फ्रेडरिक मॅक्सम्युलर (क) माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन (ड) सर जॉन मार्शल 9 / 9 भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे ______ हे पहिले सरसंचालक होत. (मार्च २२) (अ) अलेक्झांडर कनिंगहॅम (ब) विल्यम जोन्स (क) जॉन मार्शल (ड) फ्रेडरिक मॅक्सम्युलर Your score isThe average score is 55% 0% Restart quiz Post Views: 2,810