मुलींच्या लग्नाची किमान वयोमर्यादा १८ वर्षे पेक्षा जास्त करणार?
आपल्या भारत देशात सध्या कायद्यानुसार पुरुषांसाठी लग्नाची किमान वायोर्यादा 21 वर्षे तर स्त्रियांसाठी ही १८ वर्षे आहे. परंतु लवकरच कायद्यात बदल करून मुलींच्या लग्नाच्या वयोमर्यादेत बदल करून ती वाढवण्याची शक्यता आहे. याबाबत एक अभ्यास समिती स्थापन करण्यात आलेली आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
आज एकविसावे शतक उजाडले तरी महिलांवर अन्याय अत्याचार होणे कमी झाले नाही. आज कोणतीही पदवी घ्यायची झाल्यास ती पदवी घेण्यास 21 वर्षे जातात. मुलींचे लग्न १८ व्या वर्षी झाल्याने पुढचे शिक्षण घेणे कठीण होते. तसेच अनेक आरोग्याच्या समस्या सुद्धा निर्माण होवू शकतात. म्हणून मुलीचे लग्नासाठीचे वय वाढवण्याची शिफारस केली जाणार आहे.
परंतु नेमके हे वय किती होवू शकते? तर मुलींच्या लग्नासाठीचे वय हे १८ वरून 21 करण्याची हालचाल सरकारी पातळीवर सुरु असल्याचे संकेत देण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाने 2 जून रोजी एक समिती स्थापन केलेली आहे. हि समिती विवाहाचे किमान वय काय असावे याचा अभ्यास करून अहवाल केंद्र सरकारला देईल. जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीत नीती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद पॉल आणि केंद्र सरकारच्या महत्वाच्या विभागांच्या साचीवांचाही समावेश आहे.