दहावीची गुणपत्रिका (Result / Marksheet) 26 मे ला शाळेत मिळणार

दहावीची गुणपत्रिका (Result / Marksheet) 26 मे ला शाळेत मिळणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणारी इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा यावर्षी लवकर घेण्यात आली होती. इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारी तर इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा 11 फेब्रुवारी पासून सुरू झाली होती. त्यामुळे यावर्षी इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल लवकर लागला आहे. दहावीचा निकाल 13 मे २०२५ लागला होता
26 मे रोजी मिळणार गुणपत्रिका
13 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल हा online पाहण्यात आला होता. परंतु या निकालाची गुणपत्रिका विद्यार्थ्यांना 26 मे रोजी दुपारी 3 वाजल्यानंतर संबंधित शाळेत मिळणार आहे. यासंदर्भात 20 मे रोजी बोर्डाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. या गुणपत्रिकेसोबत विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखलाही मिळेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी

21 मे पासून अकरावी online प्रवेश प्रक्रिया सुरु
दहावीचा निकाल लागण्याआधीच बोर्डाने इयत्ता अकरावीच्या प्रवेशाबाबत परिपत्रक जारी केले होते. यानुसार 19 मे पासून या प्रक्रियेला सुरुवात होणार होते. 19 आणि 20 मे रोजी विद्यार्थ्यांना practice फॉर्म भरता येणार होते. 21 मे पासून online फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.