English Grammar – Tense (काळ)
नमस्कार मित्रांनो आज आपण इंग्रजी विषयातील काळ या भागावर चर्चा करणार आहोत. इंग्रजी किंवा कोणत्याही भाषेचा विचार केला तर तीन मुख्य काळ असतात. हे तीन काळ खालीलप्रमाणे आहते.
Present Tense – वर्तमानकाळ
Past Tense – भूतकाळ
Future Tense – भविष्यकाळ
वरील प्रत्येक काळात विभाजन हे चार काळांमध्ये होताना दिसते. यात Simple (साधा काळ), Continuous (चालू काळ), Perfect (पूर्ण काळ) आणि Perfect Continuous (चालू पूर्ण काळ) यांचा समावेश होतो.
Present Tense – वर्तमानकाळ
Simple Present Tense – साधा वर्तमानकाळ
‘नेहमीची घडणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी साधा वर्तमानकाळ वापरला जातो.’
रचना – कर्ता + क्रियापदाचे पहिले रूप + कर्म
उदाहरण 1 – He goes to School.
उदाहरण 2 – They go to school.
महत्वाचा मुद्दा – या काळात कर्ता एकवचनी असेल तर क्रियापदाला s किंवा es प्रत्यय लावतात. कर्ता अनेकवचनी असेल तर क्रियापदाला s किंवा es प्रत्यय लावला जात नाही.
Present Continuous Tense – चालू वर्तमानकाळ
‘एखादी क्रिया वर्तमानात चालू आहे किंवा सुरु आहे हे दर्शवण्यासाठी चालू वर्तमानकाळ वापरतात’
रचना – कर्ता + am/is/are + क्रियापदाचे पहिले रूप + ing + कर्म