इयत्ता दहावी : विषय – मराठी – सारांश लेखन
इयत्ता दहावी : विषय – मराठी | सारांश लेखन
‘आपले म्हणणे थोडक्यात सांगा’ आजच्या धावपळीच्या युगातले हे परवलीचे वाक्य आहे. एखाद्या विस्तृत लेखनाला त्याचा संपूर्ण आशय लक्षात येईल अशा पद्धतीने संक्षिप्त रूप देणे, हे महत्त्वाचे कौशल्य आहे. हे कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने ‘सारांश लेखन’ या घटकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.
सारांश लेखनाच्या पायऱ्या :
(१) दिलेल्या परिच्छेदाचे वाचन करणे.
(२) परिच्छेदातील आशयाचे आकलन होणे.
(३) मध्यवर्ती विचार जाणून घेणे.
(४) समजलेला विचार स्वत: च्या शब्दांत थोडक्यात मांडणे
कृतिपत्रिकेसाठी-
(१) सारांश लेखन उतारा १०० ते १२० शब्दांचा असेल.
(२) दिलेल्या परिच्छेदाचा थोडक्या (कमीत कमी) शब्दांत सारांश लिहिणे अपेक्षित आहे.
(३) परिच्छेदाच्या सारांशातून संपूर्ण आशय लक्षात येणे अपेक्षित आहे.
(४) सारांश लेखनाची मध्यवर्ती कल्पना स्वत:च्या शब्दांत मांडणे अपेक्षित आहे.
(५) परिच्छेदाचे वा सारांशाचे शब्द मोजून नोंद करणे आवश्यक नाही.