दहावी गणित भाग 2
दहावी गणित भाग 2 – त्रिकोणमिती – व्हिडियो – test
प्रकरण 6 वे – त्रिकोणमिती
व्हिडियो
काही महत्वाचे
इयत्ता नववीमध्ये आपण लघुकोनाची काही त्रिकोणमितीय गुणोत्तरे अभ्यासली आहेत. यावर्षी लघुकोनाचीच आणखी काही त्रिकोणमितीय गुणोत्तरे आपण अभ्यासणार आहोत.
थोर भारतीय गणिती आर्यभट
यांचा जन्म इ.स. 476 मध्ये कुसुमपूर येथे झाला. हेस्थान सध्याच्या बिहारमधील पाटणा या शहराजवळ होते. त्यांनी अंकगणित, बीजगणित आणि भूमिती या गणिताच्या शाखांत भरीव कार्य केले. ‘आर्यभटीय’ या ग्रंथात अनेक गणिती निष्कर्षत्यांनी सूत्ररूपात लिहून ठेवले आहेत. उदाहरणार्थ,
(1) अंकगणिती श्रेढीतील n वेपद काढण्याचेआणि पहिल्या n पदांच्या बेरजेचे सूत्र
(2) 2 ची किंमत काढण्याचे सूत्र
(3) या संख्येची 3.1416 ही चार दशांश स्थळांपर्यंत बरोबर असेलली किंमत, इत्यादी.
खगोलशास्त्राच्या अभ्यासात त्यांनी त्रिकोणमितीचा वापर केला आणि ज्या गुणोत्तर (sine ratio) ही संकल्पना प्रथमच वापरली. जगातील गणिताच्या त्यांच्या काळातील ज्ञानाचा विचार करता त्यांची गणितातील कामगिरी उत्तुंग होती. त्यामुळे त्यांच्या ग्रंथाचा प्रसार संपूर्ण भारतात, तसेच अरबस्तानामार्फत युरोपमध्येही झाला होता. पृथ्वी स्थिर असून सूर्य, चंद्र व तारे विशिष्ट क्रमाने पृथ्वीभोवती फिरतात असेच त्याकाळच्या सर्व निरीक्षकांचेमत होते. परंतु नावेतून जाणाऱ्याला काठावरील झाडे व वस्तू उलट दिशेला जात असल्याचा भास होतो, तसाच भास सूर्य, तारे इत्यादींबाबत पृथ्वीवरील लोकांना होतो; म्हणजे पृथ्वी भ्रमण करतेअसे आर्यभटीयात लिहिले आहे. 19 एप्रिल 1975 या दिवशी भारताने आपला पहिला उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला. या उपग्रहाला ‘आर्यभट’ हे नाव देऊन देशानेया श्रेष्ठ गणितीचा यथोचित गौरवच केला.