दहावी गणित 1
प्रकरण 1 ले – दोन चलांतील रेषीय समीकरणे
दोन चलांतील रेषीय समीकरण म्हणजे काय?
ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि चाल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी 1 असते. अशा समीकरणाना दोन चलांतील रेषीय समीकरण असे म्हणतात.
एकसामायिक समीकरणे म्हणजे काय?
जेव्हा आपण दोन चलांतील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करताे तेव्हा त्या समीकरणांना एकसामयिक समीकरणे म्हणतात.
मित्रांनो बोर्डाच्या परीक्षेला या प्रकरणावर १२ गुणांचे प्रश्न विचारले जातात. यामुळे या प्रकरणाचा अभ्यास मनापासून करणे गरजेचे आहे.
खालील शाब्दिक गणिते सोडवा
1) दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19आहे. तर त्या संख्या शोधा.
2) वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये
वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते. तर दोघांची वये काढा.