दहावी गणित 1
प्रकरण 3 – अंकगणिती श्रेढी
आपण 1, 2, 3, 4 या संख्या क्रमाने लिहितो. ही संख्यांची मालिका आहे. या मालिकेत कोणतीही संख्या कितव्या स्थानावर आहे हे आपण सांगू शकतो. जसे 11 ही संख्या 11 व्या स्थानावर आहे. 12 ही संख्या 12 व्या स्थानावर आहे. संख्यांची दुसरी मालिका पाहू. 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, … या संख्या विशिष्ट क्रमाने लिहिल्या आहेत. येथे 16 हा 4 या संख्येचा वर्ग ही संख्या 4 थ्या क्रमांकावर आहे. येथे 25 हा 5 या संख्येचा वर्ग ही संख्या 5 व्या क्रमांकावर आहे.येथे 64 हा 8 या संख्येचा वर्ग ही संख्या 8 व्या क्रमांकावर आहे. म्हणजे या ही मालिकेतील कुठली संख्या कितव्या क्रमांकावर आहे हे आपण सांगू शकतो.
नैसर्गिक संख्यांप्रमानेच विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला क्रमिक असे म्हणतात. क्रमिकेमध्ये विशिष्ट स्थानावर विशिष्ट संख्या लिहिली जाते त्या संख्येला पद असे म्हणतात.