प्रमेय 1 – दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर
दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तराएवढे असते.
प्रमेय 2 – प्रमाणाचे मुलभूत प्रमेय
त्रिकोणाच्याएका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्याउरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूंत छेदत असेल, तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते.
प्रमेय 3 – कोनदुभाजकाचे प्रमेय
त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात विभागतो.
प्रमेय 4 – समरूप त्रिकोनांची क्षेत्रफळे
जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढे असते.
प्रमेय 5 – काटकोन त्रिकोणातील समरूपता
काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात.
प्रमेय 6 – पायथागोरसचे प्रमेय
काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात.
प्रमेय 7 – स्पर्शिकाखंडांचे प्रमेय
त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात विभागतो.
प्रमेय 8 – चक्रीय चौकोनाचे प्रमेय
चक्रीय चौकोनाचे संमुख कोन पूरक असतात.