दहावी गणित भाग 1
प्रकरण 5 वे – संभाव्यता
नमस्कार मित्रांनो, इयत्ता दहावी गणित भाग 1 मधील पाचवे प्रकरण म्हणजे संभाव्यता. बोर्डाच्या परीक्षेला या प्रकरणावर आठ गुणांसाठी प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे प्रकरण बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचे आहे. या प्रकरणावरील सर्व व्हिडियो पाहण्यासाठी खालील संबंधित सरावसंचाच्या बटनावर क्लिक करा आणि व्हिडियो पहा.
संभाव्यता या शब्दाचा अर्थ तसा शक्यतो अशा स्वरूपाचा होतो. आपण आपल्या दैनंदिन जीवनात बऱ्याचदा या संभाव्यता शब्दाचा वापर करत असतो. आज पाऊस पडण्याची शक्यता आहे वैगरे. खालीलप्रमाणे भविष्यातील शक्यता वर्तवण्यासाठी देखील संभाव्यता शब्दाचा वापर खुपदा केला जातो.
बहुतेक आजपासून पाऊस पडेल
महागाई वाढण्याचा संभव खूप आहे
भारताला पुढील क्रिकेट सामन्यात हरवणे खूप कठीण आहे
निश्चित मला प्रथम श्रेणी मिळणार
बालकाला वेळेवर पोलिओ डोस दिले तर बालकाला पोलियो होण्याचा संभव खूप कमी असतो.