इयत्ता दहावी | विषय मराठी | व्याकरण | समास
मराठी व्याकरण : समास जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे शब्द यांचा लोप होऊन त्यांचा जोडशब्द तयार होतो, तेव्हा शब्दांच्या या एकीकरणाला समास असे म्हणतात. समासाचे महत्वाचे प्रकार : (१) कर्मधारय समास या समासामध्ये पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम यांचा समावेश होऊन एक शब्द तयार होतो. या शब्दांच्या एकीकरणाला कर्मधारय समास असे म्हणतात. …