दहावी बोर्ड परीक्षा | परीक्षेत गुणांवर परिणाम करणारे घटक | आत्ताच समजून घ्या
दहावी बोर्ड परीक्षा | परीक्षेत गुणांवर परिणाम करणारे घटक | आत्ताच समजून घ्या
दहावीची बोर्डाची परीक्षा १ मार्च २०२४ पासून सुरु होत आहे. सर्व विद्यार्थ्यांची बोर्डाच्या परीक्षेची उत्तम तयारी सुरु आहे. आपली संपूर्ण तयारी झाली असूनही बऱ्याचदा आपल्याला हवे तसे गुण मिळत नाहीत. असे का होते. असे कोणते घटक आहेत जे आपल्या परीक्षेतील गुणांवर थेट परिमाण करतात. ते आज आपण पाहू.
खालील घटक आपल्या परीक्षेतील गुणांवर परिणाम करतात.
1) अक्षर सुवाच्च्य नसणे, शुद्धलेखनात चुका, इंग्लिशमध्ये स्पेलिंगच्या चुका यामुळे गुण कमी होऊ शकतात. हिंदीमध्ये वाक्य संपल्यावर दंड न देणे. त्यामुळे आपले अक्षर सुवाच्य आणि व्यवस्तीत असावे. कधी कधी अक्षर चांगले किंवा सुंदर नसले तरी ते अक्षर सुटसुटीत लिहिल्यास वाचणाऱ्याला चांगले वाटते.
2) भाषा विषयात निबंधात आपले गुण बऱ्याचदा कमी होऊ शकतात. यासाठी निबंधाची सुरुवात व शेवट आकर्षक, निबंधात म्हणी, कविता यांचा वापर, सुरुवातीला मेहनत घेऊन निबंध तयार केल्यास निबंधात गुण वाढू शकतात. निबंधात चांगले मार्क्स पडण्यासाठी अवांतर वाचन आवश्यक आहे.
3) पत्र लिहिताना पत्रात पैकी च्या पैकी गुण मिळण्यासाठी पत्राचा मायना बरोबर असणे व शेवट बरोबर करणे महत्त्वाचे. हे हक्काचे मार्क समजायला हरकत नाही.
4) काही विद्यार्थी घाईघाईने प्रश्न वाचतात, प्रश्न नीट समजावून घेत नाहीत व भलतेच उत्तर लिहून ठेवतात.
5) गणिताच्या पेपरमध्ये स्टेपला गुण असतात. नुसते उत्तर बरोबर येऊन चालत नाही. त्यामुळे प्रत्येक गणित सोडवत असताना योग्य त्या पायऱ्यांचा अवलंब करावा.
6) उत्तरात सर्व आवश्यक मुद्दांयचा समावेश करायला पाहिजे. तसेच उत्तर लिहिताना जेवढ विचारलं आहे तेव्हढाच लिहा. त्यापेक्षा कमी पण नका आणि जास्त पण लिहू नका.
7) उत्तराची मांडणी व्यवस्थित पाहिजे.
8) अभ्यासक्रमाची नीट माहिती करून न घेणे. अभ्यासक्रमाची नीट माहिती झाल्यास कुठल्या भागावर किती भर द्यायचा ते कळेल. मुख्यतः व्याकरणाच्या प्रश्नाच्या बाबतीत बरेचजण बेफिकीर राहतात.
9) आकृत्यांचा सराव नसणे, आकृत्या प्रमाणबद्ध नसणे, आकृत्यांतील भागांना नावे न देणे.
10) इंग्रजीचा शब्दसंग्रह कमी असल्यामुळे Unseen Passage चे उत्तर लिहिता न येणे.
11) गणितात चिन्हांचे गोंधळ, पाढे पाठ नसल्यामुळे होणाऱ्या चुका, घाई- गडबडीत साध्या साध्या बेरजा, वजाबाक्या चुकणे.
12) एखादा प्रश्न किंवा मुद्दश्यनंतर आठवल्यावर लिहू, असे ठरविल्यावर नंतर तो लिहायचा विसरून जाणे. चूक-बरोबर जेवढे येईल तेवढे लिहायला पाहिजे. असे होऊ नये म्हणून शेवटच्या १०-१५ मिनिटांत उत्तरपत्रिका काळजीपूर्वक तपासावी.