बेस्ट ऑफ Five म्हणजे काय? यावर्षी बेस्ट ऑफ Five असणार काय?
बेस्ट ऑफ Five म्हणजे काय? यावर्षी बेस्ट ऑफ Five असणार काय?
मित्रांनो महाराष्ट्र बोर्ड माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाची २०२३ ची बोर्ड परीक्षा यावर्षी २ मार्च २०२३ पासून सुरु झाली आहे. तेव्हापासून मुलांना उस्तुकता लागली आहे की, यावर्षी बेस्ट ऑफ Five असणार आहे की नाही? तसेच काही मुले अजूनही एका संभ्रमात आहेत की बेस्ट ऑफ Five म्हणजे काय?
सर्वात आधी पहिल्या प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेऊ की बेस्ट ऑफ Five या वर्षी असणार आहे काय?
उत्तर – मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून बेस्ट ऑफ Five प्रमाणे इयत्ता दहावीच्या मुलांचे टक्के काढले जातात. बेस्ट ऑफ Five प्रमाणे मुलांना गुण दिले जातात. तसेच यावर्षीही असण्याची शक्यात्ता दाट आहे. कारण यावर्षी बेस्ट ऑफ Five नसणार असे अजून बोर्डाने कुठेही सांगितले नाही.
आता दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर बघू – बेस्ट ऑफ Five म्हणजे काय?
- तर मित्रांनो बेस्ट ऑफ Five म्हणजे परीक्षेच्या निकालावर सहापैकी ज्या ५ विषयांत मुलाला सर्वाधिक गुण मिळालेले आहेत. त्याच्ग पाच विषयांचे गुण गृहीत धरून विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी काढली जाते.
- यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी वाढण्यास मदत होते.