दहावी इंग्रजी
दहावी इंग्रजी – 1.2 An Encounter of a Special Kind | उतारा आणि सराव चाचणी
1.2 An Encounter of a Special Kind
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणावरील सराव चाचणी देण्यासाठी या विडीयो खालील लिंक वर क्लिक करा. परंतु सराव चाचणी सोडवण्याच्या अगोदर या लिंक खाली चाचणीत दिलेल्या उताऱ्याचे मराठी भाषांतर केलेले आहे. ते तुम्ही आधी वाचले तर तुम्हाला सराव चाचणी देताना अडचणी नाही येणार.
https://forms.gle/5kJmewUXvBDmANsu7
एक अविस्मरणीय चकमक – अनुवाद
लेखकाचे वडील हे पश्चिम बंगाल मधील राणीगंज येथे एका खाजगी कंपनीमध्ये वैद्यकीय सेवेत कार्यरत होते. एका मोठ्या आवारातील स्वतंत्र अशा बंगल्यांमध्ये कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यासाठी राहण्याची व्यवस्था कंपनीने केली होती. या आवाराच्या एका कोपऱ्यात लेखकाचे घर होते. लेखकाच्या बागेला लागून असलेल्या कुंपणाच्या भिंतीलगत अधिकारी लोकांचा क्लब होता. हा सर्व परिसर रंगीबेरंगी फुले, हिरवळ आणि डेरेदार वृक्षांनी बहरलेला होता. प्रत्येक घराच्या परसबागेतील असणाऱ्या मोसमी भाज्या आणि बहारदार झाडांमुळे अनेक पक्षी व खारी आकर्षित होवून इथे कायम येत असत. जवळच असलेल्या पिंपळाच्या झाडावर वानरांच्या टोळीने मुक्काम थाटला होता. या सगळ्या बाबी लेखक आणि त्याच्या कुटुंबाच्या अस्तित्वाचा आणि दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेल्या होत्या.
एका शनिवारी घडलेल्या एका लहानश्या घटनेने मात्र लेखकाच्या मनावर खोलवर परिमाण केला. परमेश्वराच्या अजब अशा किमयेचा अनोखा पैलू लेखाकासमोर उलगडला होता. दुर्गा पुजेची सुट्टी मिळून काहीच दिवस झाले होते. या सुट्ट्यांमध्ये सर्व लहान मुलांसाठी या काळात विविध मासिके आणि गोष्टींची पुस्तके प्रकाशित होत असत. याच पुस्तकांच्या वाचनात बुडून जाण्याची संधी लेखकालाही मिळाली होती.