A teenager’s Prayer – किशोरवयीन मुलांची प्रार्थना
A teenager’s Prayer – मराठी भाषांतर आणि आणि व्हिडियो
नमस्कार या लेखात आपण A teenager’s Prayer ही इंग्रजी विषयातील पहिली कविता अभ्यासणार आहोत. यात आपण या कवितेचे मराठी भाषांतर तुम्हाला सांगणार आहोत तसेच या कवितेवरील व्हिडियो सुद्धा तुम्हाला पाहता येईल.
किशोरवयीन मुलांची प्रार्थना
या कवितेत कवी म्हणतोय कि, नवीन दिवस हा एक नवीन सुरुवात घेवून येत असतो. या नव्या दिवसात काय करायचे आहे याचा निर्णय पूर्णपणे मलाच घ्यायचा आहे. कोणत्या मार्गाने मला जायचं आहे तो मार्ग केवळ मी आणि मीच निवडणार आहे.
मी निवडलेला जीवनाचा मार्ग हा मला मोठ्या यशाकडे घेवून जाणारा असेल किंवा अंधाऱ्या रस्त्याकडे घेवून जाणारा हा मार्ग असेल जिथे खूप मोठे दु:ख असेल .
देवा कृपया माझे डोळे नेहमी उघडे असुदे. मला सर्व काही स्पष्ट दिसुदे. जे बरोबर आहे किंवा जे योग्य आहे त्याच्या बाजूने खंबीरपणे उभं राहण्याची ताकद मला दे.
देवा मला काही गोष्टींसाठी नाही म्हणण्याची ताकद दे जसे माझ्या आयुष्यात मला कुठल्याही गोष्टीचा मोह आला कि त्याला नाही म्हणण्याची ताकद मला दे. माझं शरीर आणि मन हे नेहमी शुद्ध राहूदे. प्रत्येक दिवसासाठी माझं शरीर सुदृढ असुदे.
जेव्हा माझं किशोर वय संपलेलं असेल ते चित्र किंवा भविष्य मला दिसतंय. मी माझं आयुष्य खूप आनंदात जगलो. कारण देवा तू माझ्या सोबत प्रवास करत होतास.