तांत्रिक कारणास्तव अकरावी CET अडमिशन ची वेबसाईट बोर्डाकडून बंद! फॉर्म भरण्याची मुदत वाढवून मिळणार!
तांत्रिक कारणास्तव अकरावी CET ऍडमिशनची वेबसाईट बोर्डाकडून बंद! फॉर्म भरण्याची मुदत वाढवून मिळणार!
खालील डाऊनलोड बटनावर क्लिक करून बोर्डाचे परिपत्रक बघा
या वर्षी इयत्ता अकरावी प्रवेशासाठी महारष्ट्र बोर्डाकडून सामाईक प्रवेश परीक्षा – CET जे आयोजन करण्यात आले. यासाठी 20 जुलै पासून प्रवेशासाठी cet.mh-ssc.ac.in या संकेत स्थळावर आवेदनपत्रे – फॉर्म भरणे सुरु होते. परंतु काही तांत्रिक कारणामुळे बोर्डाकडून 21 जुलै संध्याकाळपासून ही वेबसाईट बंद करण्यात आली आहे. आणि लवकरच हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करून वेबसाईट पूर्ववत करण्यात येईल असे सुद्धा सांगण्यात आले आहे.
गेल्या 2 दिवसांपासून अनेक विद्यार्थ्याना या वेबसाईट वर तत्यांचे अर्ज भरताना खुप अडचणींना सामोरे जावे लागत होते. आज संध्याकार्पर्यंत सुद्धा लाखो मुलांचे अर्ज भरून झाले नव्हते. आता वेबसाईट बंद केल्यामुळे बोर्डाने 26 जुलै ही अर्ज करण्याची अंतिम तारीख दिली होती ती सुद्धा पुढे ढकलण्यात येणार आहे.आधी बोर्डाने 19 जुलै ते 26 जुलै ही तारीख दिली होती. आता लवकरच पुढची तारीख देण्यात येणार आहे.
यावर्षी बोर्डाची परीक्षा रद्द झाल्यामुळे इयत्ता अकरावी चे अडमिशन हे सामाईक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून घेतले जाणार आहेत. हे परीक्षा एकूण 100 गुणांची बहुपर्यायी स्वरुपाची असणार असून यात इंग्रजी, गणित, विज्ञान आणि समाज शास्त्र हे चार विषय असणार आहेत. यातील प्रत्येक विषयावर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत.