अकरावी CET परीक्षेचा फॉर्म भरण्याची नवीन तारीख | 26 जुलै दुपारी 3 पासून ऑनलाईन अर्ज सुरु होणार !
अकरावी CET परीक्षेचा फॉर्म भरण्याची नवीन तारीख | 26 जुलै दुपारी 3 पासून ऑनलाईन अर्ज सुरु होणार !
CET – परिपत्रक
खालील लिंक वर फॉर्म भरा
https://cet.11thadmission.org.in/
इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी CET परीक्षा बोर्डाकडून घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 19 जुलै पासून राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार होते. परंतु ही तारीख आणखी एक दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे. कारण आज 26 जुलै दुपारी 3 पासून 2 ऑगस्ट पर्यंत हे अर्ज करण्यासाठी पोर्टल सुरु होण्याची शक्यता आहे.
प्रवेश अर्जाची प्रक्रिया आणि पायऱ्या खालील प्रमाणे असतील
1) सर्वात आधी खालील लिंक वर क्लिक करा.
https://cet.11thadmission.org.in/
2) या लिंक वर क्लिक केल्यावर आपला बैठक क्रमांक – Seat Number – Hall Ticket Number – टाका
3) आपला इ मेल आयडी भरा – उपलब्ध असल्यास
4) आपला मोबाईल क्रमांक अद्यावत करा
5) आपला जिल्हा तालुका भरा
6) दोन पर्याय असतील – परीक्षा द्यायची किंवा नाही – यापैकी योग्य तो पर्याय निवडा
7) सबमिट करा
तुमची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली.. धन्यवाद
नुकताच इयत्ता दहावीचा महाराष्ट्र बोर्डाचा निकाल लागला. हा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर लावण्यात आला होता. हा निकाल जाहीर झाल्यावर आता अकरावी च्या प्रवेशासाठी CET म्हणजे सामायिक प्रवेश परीक्षा होणार आहे. ही परीक्षा OMR पद्धतीने होणार असून 100 गुणांची बहुपर्यायी प्रश्न या प्रश्नपत्रिकेत असतील. 26 जुलै पासून राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. अर्ज करण्याची पद्धत अतिशय सोप्पी आहे.
या परीक्षेसाठी महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे शुल्क अकरावे लागणर नाही. तसेच त्याना ही परीक्षा द्यायची आहे की नाही एवढीच माहिती संकेत स्थळावर भरावी लागेल. या परीक्षेसाठी महाराष्ट्र बोर्डाच्या मुलांना जरी शुल्क भरावे लागणार नसले तरी इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मात्र १७० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.