अकरावी CET HALL TICKET कधी मिळणार ? कुठ आणि कसं डाऊनलोड करणार?
करावी CET HALL TICKET कधी मिळणार ? कुठ आणि कसं डाऊनलोड करणार?
या वर्षी लॉकडाऊन मुळे इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर अंतर्गत मुल्यामापनाच्या आधारावर इयत्ता दहावीचा निकाल 16 जुलै 2021 या तारखेला online पद्धतीने लागला. यानंतर CET परीक्षेसाठी online अर्ज भरणे सुरु झाले. या online अर्ज भरण्याची अंतिम तारीख 02 ऑगस्ट 2021 या तारखेपर्यंत आहे. 02 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजता ही प्रवेश प्रक्रिया बंद होईल असे बोर्डाकडून सांगण्यात आले.
ही सामाईक प्रवेश परीक्षा 21 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11:00 ते दुपारी 1:00 दरम्यान असणार आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी असणाऱ्या CET (सामाईक प्रवेश परीक्षा) साठी हॉल तिकीट सोबत असणे गरजेचे आहे असे बोर्डाने आपल्या सदर केलेल्या पत्रात (प्रकटन) सांगितले आहे. परंतु हॉल तिकीट कधी मिळणार याची मुले वाट पाहत आहे. तरीही सर्वसाधारण अंदाजानुसार हे हॉल तिकीट प्रेवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे 02 ऑगस्ट पर्यंत प्रवेश प्रक्रिया असेल. यानंतर किती मुलांनी प्रवेश घेतला आहे याचा अंदाज येईल. त्यामुळे हॉल तिकीटासाठी अजून काही काल मुलांना थांबावे लागेल.
हॉल तिकीट कुठं आणि कसे मिळेल?
मित्रांनो तुम्ही ज्या संकेतस्थळावर online अर्ज भरला आहे त्याच संकेत स्थळावर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करता येईल. यासाठी तुम्हाला तुमचा Application Number, मोबाईल नंबर आणि Seat Number ची आवश्यकता असेल.
या वर्षी होणार CET – सामाईक प्रवेश परीक्षा ही 2 तासांची असून गणित, इंग्रजी, विज्ञान आणि समाजशास्त्र हे चार विषय असणार आहेत. प्रत्येक विषयाला 25 गुण असून एकूण 100 गुणांचा पेपर असणार आहे. यासाठी तुम्हाला OMR पद्धतीची उत्तरपत्रिका असणार आहे.