बोर्डाची वेबसाईट कधी सुरु होणार? फॉर्म भरण्याची अंतिम मुदत काय असेल?
बोर्डाची वेबसाईट कधी सुरु होणार? फॉर्म भरण्याची अंतिम मुदत काय असेल?
गेल्या 2 दिवसांपासून इयत्ता अकरावी सामाईक प्रबेश परीक्षा – CET साठी सुरु असलेली वेबसाईट काही तांत्रिक कारणांमुळे महाराष्ट्र बोर्डाकडून बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी मोठ्या चिंतेत आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेत ते विद्यार्थी सुद्धा विचार करत असतील की आमच्या आमचं पुढे काय होणार आणि ज्यांना फॉर्म भरता नाही आला असे विद्यार्थी सुद्धा काळजीत आहेत. त्यामुळे बोर्ड कधी वेबसाईट सुरु करेल याची सर्व विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत.
सध्या तात्पुरती बंद असलेली बोर्डाची वेबसाईट येत्या 1 ते 2 दिवसांपासून पुन्हा सुरळीतपणे सुरु होईल असे बोर्डाच्या हेल्पलाईन क्रमांकावर फोन केल्यास समजते. तसेच ज्यांनी फॉर्म भरलेत अशा विद्यार्थ्यांना घाबरण्याचे काहीच कारण नाही असे सुद्धा सांगण्यात येत आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्याचे राहून गेले आहे त्यांना सुद्धा चिंता करण्याचे कारण नाही असे बोर्डाकडून सांगण्यात येत आहे.
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख किती असेल?
19 जुलै 2021 रोजी बोर्डाने आपल्या संकेतस्थळावर परिपत्रक जाहीर केले होते. या परिपत्रकानुसार 20 जुलै ते 26 जुलै पर्यंत फॉर्म भरता येईल असे सांगण्यात आले होते. परंतु सध्या वेबसाईट बंद असल्यामुळे ही मुदत मुलांना वाढवून देण्यात येणार असे सुद्धा बोर्डाकडून सांगण्यात येत आहे. याबाबत लवकरच परिपत्रक निघेल या परिपत्रकात बोर्डाची वेबसाईट केव्हा सुरु होईल आणि फॉर्म भरण्याची अंतिम मुदत काय असेल या संदर्भात अधिक तपशील असेल.