11th Admission Process | फॉर्म भरताना अडचण येते? ही पुस्तिका वाचा

11th Admission Process | फॉर्म भरताना अडचण येते? ही पुस्तिका वाचा
इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर 21 मे पासून इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार होती. परंतु काही कारणांमुळे वेबसाईट बंद झाली त्यामुळे 21 मे पासून सुरू होणारी प्रक्रिया थोडी लांबली आणि 26 मे पासून सकाळी अकरा वाजता ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली.
सध्या सर्व विद्यार्थी वेबसाईट वरती जाऊन इयत्ता अकरावीचे ऑनलाइन फॉर्म भरत आहेत. परंतु हे फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासाठी बोर्डाने आपल्याच वेबसाईटवर एक पुस्तिका जाहीर केले आहे. या पुस्तिकेतून अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया संबंधी मार्गदर्शन करण्यात आले आहे.