11th Admission | New Update | या तारखेपासून फॉर्म भरा

11th Admission | New Update | या तारखेपासून फॉर्म भरा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल यावर्षी 13 मे या तारखेला ऑनलाइन लागला. येत्या 26 मे रोजी विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका शाळेमध्ये दुपारी तीन नंतर मिळेल.

इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया यावर्षी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. 19 मे पासून ही प्रक्रिया ऑनलाइन होणार असे सांगण्यात आले होते. त्याचप्रमाणे ही प्रक्रिया 19 मे पासून सुरू झाली होती. 19 आणि 20 मे या दोन तारखांना विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस फॉर्म भरता येणार होते. तसे अनेक विद्यार्थ्यांनी हे प्रॅक्टिस फॉर्म भरले होते. 21 मे पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात फॉर्म भरता येणार होते. परंतु या दिवशी सकाळपासून अकरावीच्या ऍडमिशन प्रक्रियेसाठी तयार केलेली वेबसाईट सुरू झाली नाही. वेबसाईट वरती अनेक विद्यार्थी केले परंतु त्यांना फॉर्म भरता आले नाही. पुढे वेबसाईटचे काम सुरू आहे काही त्रुटी आहेत या त्रुटी लवकरच दुरुस्त होतील असे सांगण्यात आले. परंतु 22 तारखेच्या संध्याकाळपर्यंत तरी ही वेबसाईट सुरू झाली नाही. शेवटी ही वेबसाईट येत्या 26 मे पासून सुरु होणार असे सांगण्यात आले. यानुसार 26 मे पासून सकाळी अकरा वाजल्यापासून विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरू शकतात असे जाहीर करण्यात आले.