या लिंक वर बघा दहावीचा निकाल | इयत्ता दहावी निकाल २०२५ | SSC Board Exam Result 2025

या लिंक वर बघा दहावीचा निकाल | इयत्ता दहावी निकाल २०२५ | SSC Board Exam Result 2025
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेतल्या गेलेल्या इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 13 मे रोजी दुपारी 1 वाजता खालील लिंक वर पाहायला मिळेल.

https://sscresult.mahahsscboard.in
https://results.targetpublications.org
यावर्षी दहावीची परीक्षा लवकर झाली होती म्हणून निकाल लवकरच जाहीर करण्यात आला होता. यावर्षी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत एकूण ९४.१० टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. यावर्षी दहावीचे एकूण १६१०९०८ होते यापैकी १५९८५५३ विद्यार्थी यापरीक्षेला बसले होते त्यापिकी १४८७३९९ विद्यर्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. हा निकाल ९३.०४ % हा निकाल आहे. सर्व विभागातून मिळून निकाल पाहिल्यास यावर्षीही कोकण विभागाने बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल ९८.८२% इतका आहे. सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा असून तो ९०.७८ टक्के आहे. सर्व विभागीय मंडळातून मुलींच्या पास होण्याची टक्केवारी ही ९६.14 टक्के असून ९२.३१ टक्के मुळे पास झाली आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींच्या पास होण्याची टक्केवारी ही मुलांच्या टक्केवारीपेक्षा 3.८३ टक्केने जास्त आहे. माध्यमिक शाळांत परीक्षा ही एकूण ६२ विषयांसाठी घेण्यात आली असून यातल्या एकूण २४ विषयांचा निकाल हा 100 टक्के लागला आहे.