Uncategorized

बारावीचा निकाल जाहीर ०३ ऑगस्ट ला या लिंक वर | HSC Result 2021

बारावीचा निकाल जाहीर ०३ ऑगस्ट ला या लिंक वर…

१६ जुलै २०२१ ला दुपारी 1 वाजता इयत्ता दहावीचा निकाल लागला. महारष्ट्र राज्याचा ऐतिहासिक असा 95.95% निकाल लागला. आता गेल्या अनेक दिवसांपासून सर्व विद्यार्थी वर्ग इयत्ता बारावीचा निकाल कधी लागेल याची वाट पाहत होते. परंतु हि वाट पाहणे आता थांबणार असून उद्या मंगळवार दिनांक ०३ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी 4 वाजता हा निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल आपण खालील लिंक वर पाहू शकतो.

https://msbshse.co.in/

खरतर मागील आठवड्यात हा निकाल लागणे अपेक्षित होते. 31 जुलै पर्यंत निकाल लावणार असे बोर्डाकडून आधी सांगण्यात आले होते. परंतु आता उद्या दुपारनंतर हा निकाल लागणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी उद्या दुपारी 4 वाजल्यानंतर वरील लिंक वर क्लिक करून हा निकाल पहावा. तत्पूर्वी १६ जुलै या तारखेला दुपारी महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावीचा निकाल लागला होता. यात महराष्ट्र बोर्डाचा निकाल ९९% पेक्षा अधिक लागला आता उद्या बारावीचा निकाल सुद्धा खूप चांगला लागण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या त्यामुळे सर्व निकाल हा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर तयार करण्यात आला आहे. #HSCResult2021