Uncategorized

दहावी विज्ञान भाग 1 – मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण – IMP कारणे द्या

दहावी विज्ञान भाग 1 – मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण

महत्वाची कारणे द्या

(1) आवर्तनात डावीकडून उजवीकडे जात असताना अणुत्रिज्या कमी होत जाते

उत्तर – 1) अणुचा आकार हा अणुच्या त्रिज्येवरून ठरवला जातो.

2) आवर्तनात डावीकडून उजवीकडे जात असताना शेवटच्या कक्षेत एका नवीन इलेक्ट्रोन ची भर पडते.

3) यामुळे केंद्राकावरील धनभार वाढत जातो. या वाढलेल्या धनभारामुळे इलेक्ट्रोन केंद्राकडे अधिकच खेचले जातात.

4) यामुळे, आवर्तनात डावीकडून उजवीकडे जात असताना अणुत्रिज्या कमी होत जाते

(2) आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातूगुण कमी होत जातो

उत्तर – 1) धातूमध्ये इलेक्ट्रोन देण्याची प्रवृत्ती असते.

2) इलेक्ट्रोन दिल्याने धन प्रभार तयार होतो. यालाच धातुगुण म्हणतात

3) शेवटच्या कक्षेत जितके इलेक्ट्रोन कमी तितका धातुगुण हा जास्त असतो.   

4) अवर्तानामध्ये आपण जसजसे डावीकडून उजवीकडे जातो तसे तसे बाहेरील कक्षेतील इलेक्ट्रोन ची संख्या एक एक ने वाढत जाते.

5) म्हणून आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातूगुण कमी होत जातो

(3) गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते.  

उत्तर – 1) अणुचा आकार हा अणुच्या त्रिज्येवरून ठरवला जातो.

2) अणुची त्रिज्या म्हणजे अणुकेंद्र आणि शेवटची कक्षा यांमधील अंतर होय

3) गणात वरून खाली येत असताना खालील मुलद्रव्याच्या अणुची शेवटची एक एक कक्षा वाढत जाते.

4) म्हणून केंद्र आणि शेवटची कक्षा यांमधील अंतर वाढून त्रिज्येची लांबी वाढत जाते

5) म्हणून, गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते.