दिवाळीनंतर सुरु होणाऱ्या शाळांसाठी मार्गदर्शक सूचना
दिवाळीनंतर सुरु होणाऱ्या शाळांसाठी मार्गदर्शक सूचना
नुकताच दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्यसरकारने सुद्धा शाळा सुरु करण्याच्या संबंधी हिरवा कंदील दिला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात (23 नोव्हेंबर पासून) इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार असून यासंबंधी काही मार्गदर्शक सूचना आणि नियम सुद्धा जाहीर करण्यात आले आहेत. हे नियम खालीलप्रमाणे आहेत
मार्गदर्शक सूचना – नियम
- विद्यार्थ्यांची उपस्थिती बंधनकारक नाही.
- पालकांच्या संमतीशिवाय विद्यार्थ्यांना परवानगी मिळणार नाही. यासाठी पालकाचे संमतीपत्रक आवश्यक
- शिक्षकांना आरोग्य चाचणी बंधनकारक
- एका वेळेस पन्नास टक्के विद्यार्थी येतील.
- शाळा तीन ते चार तासापेक्षा जास्त वेळ असणार नाही.
- शाळेत नेहमीप्रमाणे परिपाठ आणि स्नेहसंमेलन यांसारखे कार्यक्रम होणार नाहीत.
- एका बेंचवर एकच विद्यार्थी असेल.
- सुरक्षित अंतर, मास्क, स्वच्छतेचे नियम पाळून शाळा सुरु करणे.
- वस्तूंची अदलाबदल न करण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देणे.
- वसतिगृहे आणि आश्रमशाळा सुरु करण्यास परवानगी. यासाठी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक.
- शाळेबाहेरील आवारात विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही याची काळजी घेणे.
- शाळेत डबे खाण्यास परवानगी नसेल.
- शाळेतील विद्यार्थी कार्माचारी, शिक्षक यांच्या येण्याजाण्याच्या वेळा गर्दी टाळण्यासाठी वेगवेगळ्या असतील.
- शाळेच्या आवारात चार पेक्षा जास्त विद्यार्थी येणार नाहीत याची शाळेतील मुख्याध्यापकांनी काळजी घेणे आवश्यक.
तर मित्रांनो वरीलप्रमाणे नियम पळून शाळा सुरु करण्याचे निर्देश मिळाले आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.