शाळा दिवाळीनंतर सुरु होणार काय?
गेल्या अनेक महिन्यांपासून लॉकडाऊनमुले महाराष्ट्रातील शाळा बंद आहेत. शाळा नेमक्या कधी सुरु होतील याची वाट अनेक पालक आणि विद्यार्थी पाहत आहेत. परंतु शाळा सुरु करण्याचा निर्णय हा दिवाळीनंतरच घेतला जाईल असे स्पष्टीकरण शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

राज्यसरकार टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करेल असे अशी माहिती वर्ष गायकवाड यांनी दिली आहे. सुरुवातीला इयत्ता नववी ते बारावी इयत्तांचे वर्ग सुरु होऊ शकतात. कारण नववी ते बारावी मधील विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील लहान मुलांपेक्षा जास्त सजग असतात.
तसेच जसे शाळा टप्प्याटप्प्याने सुरु होतील असं सांगितल आहे त्याचप्रमाणे शाळेतील फी सुद्धा टप्प्याटप्प्याने दिली जाण्याची मुभा असेल असे स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी केले. ज्या शाळेत अशाप्रकारची मुभा दिली जाणार नाही त्या शाळेवर कारवाई सुद्धा होऊ शकते असे त्यांनी सांगितले आहे.