TAIT Exam 2023 Nots | TAIT परीक्षा 2023 PDF Notes
TAIT Exam 2023 Notes | TAIT परीक्षा 2023 PDF Notes
नुकतीच TAIT परीक्षेची तारीख सरकार कडून घोषित करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी तुमची तयारी सुरु असेलच. यासाठी आपण तुमच्या अभ्यासासाठी गणित विषयाच्या नोट्स या लिंक वर शेअर करत आहोत. खालिक बटनांवर क्लिक करून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता.
लवकरच इतर घटकांच्या नोट्स शेअर केल्या जातील.
संख्यांचे प्रकार
नैसर्गिक संख्या – १, २, ३, ४, ५, …
पूर्ण संख्या – ०, १, २, ३, ४, …
पूर्णांक संख्या – …, -३, -२, -१, ०, १, २, ३, …
सम संख्या – ज्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जातो किंवा ज्या संख्या दोन च्या पाढ्यात – पटीत येतात अशा संख्याना सम संख्या म्हणतात. उदा. – २, ४, ६, ८, १०, …
विषम संख्या – ज्या संख्याना दोन ने पूर्ण भाग जात नाही किंवा ज्या संख्या २ च्या पटीत किंवा २ च्या पाढ्यात येत नाहीत अशा संख्यांना विषम संख्या म्हणतात. उदा. – १, ३, ५, ७,…
मूळ संख्या – ज्या संख्यांना फक्त दोनच संख्यांनी भाग जातो. एक ती स्वतः आणि दुसरी म्हणजे १. अशा संख्यांना मुळ संख्या असे म्हणतात. उदा. – २, ३, ५, ७, ११, …
- दोन ही एकमेव सम मूळ संख्या आहे.
- १ ते १० दरम्यान ४ मुल संख्या येतात.
- १ ते ५० दरम्यान १५ मूळ संख्या येतात.
- १ ते १०० दरम्यान २५ मूळ संख्या येतात.