स्वतंत्र दिन विशेष कविता – वैभवशाली भारत
हि जन्मभूमी हि कर्मभूमी
हि मातृभूमी माझी
सर्वजातीधर्मांना बांधून ठेवणारी
ही भारतभूमी माझी || धृ ||
वैभवशाली सामर्थ्य पहिले
देवनागीरीचे मातृभूमीने
सोन्याचाही धूर पहिला
माझ्या भारत भूमीने
थोर वैभवलक्ष्मी असलेली
मायमाऊली माझी || १ ||
फांदीवरती पक्षी सोन्याचा
करीत असे किलबिल
या पक्षाच्या आवाजातून
ऐकू येई गीत सुरेल
सात सुरांनी नटलेली
ही स्वरगंगाई माझी || 2 ||
हि जन्मभूमी हि कर्मभूमी
हि मातृभूमी माझी
सर्वजातीधर्मांना बांधून ठेवणारी
ही भारतभूमी माझी | धृ ||
नक्कीच मित्रांनो ही कविता तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा मी करतो. खूप वर्षापूर्वी हि कविता मी लिहिली होती. आज तुमच्यासमोर सादर करण्याचा योग आला
धन्यवाद
आपला
महेंद्र दशरथ घारे