नमस्कार मित्रांनो, सध्या शाळा बंद आहेत, क्लासेस आणि सर्व शैक्षणिक संस्था सुद्धा बंद आहेत. यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अभ्यासाचे नियोजन करणे कठीण वाटत आहे. पण मित्रांनो घाबरू नका आजच्या लेखात तुम्ही इयत्ता दहावीच्या किंवा इतर वर्गातील मुले सुद्धा अभ्यासाचे नियोजन कसे करू शकतात यावर आपण चर्चा करणार आहोत.
मित्रांनो आपल्याकडे मुख्य सहा विषय आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी हे तीन भाषा विषय (काही विद्यार्थ्यांना हिंदी ऐवजी संस्कृत विषय असेल) आणि इतर तीन विषय म्हणजे गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र. तुम्ही एक काम करू शकता अभ्यासाचं नियोजन करताना दररोज सकाळी भाषा विषय आणि संध्याकाळी गणित, विज्ञान किंवा समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास करू शकताय. यासाठी तुम्ही कुठल्या वारी कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा याचे नियोजन सुद्धा तुम्ही करू शकता. जसे सोमवार – मंगळवार सकाळी भाषा विषयांपैकी मराठी आणि संद्याकाळी गणित, बुधवार – गुरुवार (सकाळी – हिंदी, संध्याकाळी – विज्ञान) आणि शुक्रवार – शनिवार (सकाळी – इंग्रजी, संध्यकाळी – समाजशास्त्रे).
वरीलप्रमाणे नियोजन केल्यास नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि सगळ्या विषयांना योग्य न्याय देता येईल. यात रविवार हा दिवस तुमच्यासाठी रिकामा राहतो. या दिवसांत तुम्ही आपले छंद जोपासू शकताय. कोणाला चित्र काढायला आवडत असेल तर त्यांनी चित्र काढावे. ज्यांना मेहंदी काढायला आवडते त्यांनी मेहंदी काढावी इ.