दहावीच्या वेळापत्रकसंबधी बोर्डाच्या सूचना | अद्याप वेळापत्रक जाहीर नाही!
दहावीच्या वेळापत्रकसंबधी बोर्डाच्या सूचना | अद्याप वेळापत्रक जाहीर नाही!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक काही महिन्यापूर्वी जाहीर केले होते. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या दरम्यान होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी परीक्षा ८ ते १० दिवस लवकर सुरु होणार आहेत. या लेखी परीक्षांच्या संभाव्य तारखांबाबत सूचना, हरकती मागविण्यात आल्या होत्या. परंतु काही संकेतस्थळावरून फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांची वेळापत्रके जाहीर करण्यात आली असल्याबाबतची बातमी सोशल मिडीयामार्फत प्रसारित करण्यात आली असल्याचे निदर्शनास आले. त्याअनुषंगाने मंडळाने म्हटले आहे की, परीक्षेची वेळापत्रके www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त विद्यार्थी आणि पालक यांनी इतर कोणत्याही सोढाल मिडियावर विश्वास ठेऊ नये.
फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) लेखी परीक्षेची सविस्तर वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अद्याप प्रसिध्द करण्यात आलेली नाहीत. सोशल मिडीयावरून प्रसिध्द करण्यात आलेली लेखी परीक्षेची वेळापत्रके ग्राहय धरण्यात येऊ नये, असे ने स्पष्टीकरण राज्य मंडळाने दिले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी- बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रक संदर्भात सोशल मीडियावर अफवा पसरल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावर आता राज्य मंडळाने अधिकृत प्रकटन प्रसिद्ध करून खुलासा जाहीर केला आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी असे कुठल्याही प्रकारचे वेळापत्रक सोशल मिडीयावर पहिले तरी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत यासंबंधी पडताळणी करूनच अशा वेळापत्रकावर विश्वास ठेवावा