इयत्ता दहावी बारावी निकाल 2025 तारीख जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल यावर्षी लवकर लावण्यात येणार आहे यावर्षी इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा लवकर घेण्यात आली होती. इयत्ता बारावीची परीक्षा 11 एप्रिल तर दहावीची परीक्षा 21 एप्रिल पासून सुरु झाली होती. परीक्षा लवकर झाल्यामुळे यावर्षी इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल सुद्धा लवकर लागणार आहे.

15 मे पर्यंत इयत्ता दहावीचा नी बारावीचा बिकाल लागण्याची शक्यता शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे 15 मे पर्यंत या दोन्ही इयत्तांचे निकाल लागणार आहेत. दरवर्षी इयत्ता बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर दहावीचा निकाल जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागत असतो. परंतु यावर्षी हा निकाल आधीच लागेल. यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया यावर्षी लवकरच सुरु होऊन इयत्ता अकरावीचे वर्ग लवकर सुरु होतील.