दहावी अंकगणिती श्रेढी – टेस्ट – व्हिडियो
दहावी अंकगणिती श्रेढी – टेस्ट – व्हिडियो
online टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा परंतु याआधी तुम्ही या प्रकरणासंबधी एक गोष्ट वाचू शकता. जी लिंक च्या खाली दिली आहे. तसेच या प्रकरणावरील व्हिडियो पाहू शकता
चाचणी लिंक – https://forms.gle/YyzxrZLBBZ4u9TZW6
व्हिडियो
सरावसंच 3.1
सरावसंच 3.2
सरावसंच 3.3
सरावसंच 3.4
चतुर शिक्षिका
एक होता राजा. त्याने यशवंतराजे व गीतादेवी या आपल्या मुलांना घोडेस्वारी शिकवण्यासाठी अनुक्रमे तारा व मीरा या शिक्षिकांची नेमणूक केली. त्या दोघींना वर्षभरासाठी किती पगार द्यावा याबद्दल विचारले. तारा म्हणाली, ‘‘मला पहिल्या महिन्याचा पगार 100 मोहरा द्यावा व नंतर पुढील प्रत्येक महिन्यात 100 मोहरांची वाढ द्यावी. मीरा म्हणाली, ‘‘मला पहिल्या महिन्यात 10 मोहरा पगार द्यावा आणि नंतर पुढील प्रत्येक महिन्याला आधीच्या महिन्याच्या पगाराच्या दुप्पट पगार मिळावा.’’ महाराजांनी ते मान्य केले. तीन महिन्यांनंतर यशवंतराजे आपल्या बहिणीला म्हणाले, ‘‘माझी शिक्षिका तुझ्या शिक्षिकेपेक्षा जास्त हुशार वाटते, तिने जास्त पगार मागितला आहे.’’ गीतादेवी म्हणाली, ‘‘मला प्रथम तसेच वाटले. म्हणून मी मीराताईंना विचारलेसुद्धा, ‘तुम्ही कमी पगार का मागितला?’, तर हसून त्यांनी सांगितले की ‘आठ महिन्यांनंतर गंमत दिसेल, तू पाहा.’ मी आठव्या महिन्याचा पगार काढून पाहिला. तू सुद्धा काढून पाहा.’’