दहावी विषय – मराठी व्याकरण
खालील लिंक वर क्लिक करून इयत्ता दहावी मराठी व्याकरणाच्या नोट्स डाऊनलोड करा.
समास
जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे शब्द यांचा लोप होऊन त्यांचा जोडशब्द तयार होतो, तेव्हा शब्दांच्या या एकीकरणाला समास असे म्हणतात.
समासाचे महत्वाचे प्रकार :
(१) कर्मधारय समास – या समासामध्ये पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम यांचा समावेश होऊन एक शब्द तयार होतो. या शब्दांच्या एकीकरणाला कर्मधारय समास असे म्हणतात.
उदा : सामासिक शब्द विग्रह
नीलकमल नील असे कमल
महाराष्ट्र महान असे राष्ट्र
नरसिंह सिंहासारखा नर
(२) द्वंद्व समास – या समासामध्ये दोन्ही पदांना समान महत्व देण्यात येतो. जेव्हा समान प्राधान्य असलेले दोन शब्द एकत्र येऊन नविन जोडशब्द तयार होतो तेव्हा त्या समासाला द्वंद्व समास म्हणतात. या समासाचे तीन प्रकार पडतात.
(१) इतरेतर द्वंद्व समास :
उदा : सामासिक शब्द विग्रह
आईवडील आई आणि वडील