यावर्षी दहावी बारावीचा निकाल वेळेत | SSC – HSC Borad Result 2024

यावर्षी दहावी बारावीचा निकाल वेळेत | SSC – HSC Borad Result 2024
कधी लागणार निकाल?
नुकत्याच इयत्ता बारावीच्या परीक्षा आता दहावीच्या परीक्षा पण संपतील. परीक्षा संपल्या संपल्या सर्व विद्यार्थी निकालाची वाट बघत असतात. दरवर्षी इयत्ता बारावीचा निकाल मी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर इयत्ता दहावीचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागतो.
या वर्षी वेळेत निकाल लावण्याच्या दृष्टिकोनातून बोर्डाचे प्रयत्न असून, एप्रिल महिन्यातच परीक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासणीचे काम करून घेण्याचे नियोजन बोर्डाने केले आहे.

सध्या बोर्डाकडून पेपर तपासणीचे काम सुरू आहे. बारावीचे पेपर तपासण्यासाठी ६ हजार ६३० परीक्षक पेपर तपासणीचे काम करीत आहेत. ११०५ मॉडरेटर आहेत. तसेच दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणी ७ हजार २९७ परीक्षक काम करत आहेत. मंडळाने प्रत्येक परीक्षकाला दोनशे पेपर तपासणीसाठी पाठवले आहेत.
त्यामुळे यावर्षी बोर्डाचे पेपर वेळेआधी तपासून पूर्ण होण्याची शक्यता असून निकाल वेळेवर लावण्याचा बोर्डाचा ठाम निर्धार दिसून येतो.