दहावी बारावी बोर्ड परीक्षा 2025 मोठी अपडेट वेळापत्रकाच्या तारखा आल्या समोर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने यावर्षी इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा लवकर घेण्यात येणार आहेत. यावर्षी इयत्ता दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 तर बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 ते 18 मार्च 2025 दरम्यान होणार असल्याचे बोर्डाकडून जाहीर करण्यात आले आहे.
दरवर्षी बारावीची परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तर दहावीची परीक्षा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी, स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे असे सांगण्यात येत आहे. तसेच यावर्षी दहावी बारावीचा निकाल सुद्धा लवकर लागेल आणि अकरावीचे ऍडमिशन सुद्धा लवकरच होण्याची शक्यता आहे.
तसेच सर्व प्रकारच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा सुद्धा लवकर घेण्यात येणार आहे.
अधिक तपशील खालील प्रमाणे
बारावी बोर्ड परीक्षा 2025
प्रात्यक्षिक परीक्षा – 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान
लेखी परीक्षा – 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान
दहावी बोर्ड परीक्षा 2025
प्रात्यक्षिक परीक्षा – 3 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान
लेखी परीक्षा – 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान