दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
गेल्या अनेक दिवसांपासून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा नक्की कधी होणार याबद्दल विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये उस्तुकता लागून होती. हि उस्तुकता आत दूर झाली आहे कारण दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत हे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. दहावीची बोर्डाची परीक्षा ही आता जूनमध्ये आणि बारावीची मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होईल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात बोर्डाची परीक्षा होईल असे वर्षा गायकवाड यांनी ट्वीकरून सांगितले आहे.
कोरोनाचा प्रर्दुर्भाव वाढत असल्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षा पुढे सरकवा, परीक्षा रद्द करा यांसारख्या मागण्या पालक आणि विद्यार्थी संघटनानकडून येत होत्या. शेवटी मुलाचं आरोग्य आमच्यासाठी महत्वाच आहे त्यामुळे या परीक्षा पुढे नेत आहोत असे वर्षा गायकवाड म्हणाला.
याआधी बोर्डाने आपल्या संकेतस्थळावर दिलेल्या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 23 एप्रिल तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ला होणार होती. परंतु आता दहावीची परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यार आणि बारावीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. बोर्डाच्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात येईल.