दहावी बोर्डाची परीक्षा होणार की नाही? शिक्षण मंत्री काय म्हणाल्या?
दहावी बोर्डाची परीक्षा होणार की नाही? शिक्षण मंत्री काय म्हणाल्या?
नुकतेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक आपल्या वेबसाईट वर जाहीर केले आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सुद्धा आपल्या ट्वीटर account च्या माध्यमातून दहावी आणि बारावी च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्याचे सांगितले आहे. परंतु आज दिनांक 1 मार्च 2021 ला झी 24 तास या मराठी वाहिनीवर दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करण्याचा विचार सुरु आहे अशाप्रकारची बातमी दिसत आहे. या बातमीनुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा विचार सुरु आहे असे सांगण्यात येत आहे. ज्या प्रमाणे मागील वर्षी नववी आणि अकरावी मधील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता वर्षभरातील अभ्यासाचे मुल्यांकन करून पुढील वर्गात पाठवले त्याचप्रमाणे यावर्षी दहावी आणि बारावी मधील विद्यार्थ्यांना सुद्धा असेच पुढे पाठवण्याची शक्यता आहे. परंतु यावर अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही हे सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे. हि बातमी पुढीलप्रमाणे आहे.