दहावी आणि बारावीच्या परीक्षा या वेळापत्रकानुसारच होणार?
महारष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी इयत्ता बोर्डाच्या परीक्षा या निर्धारित वेळापत्रकानुसारच होणार असे असे महाराष्ट्र बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
नुकताच इयत्ता पहिली ते नाववी आणि अकरावी इयत्तांच्या शाळा – वर्ग हे 15 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी मंडळाकडून देण्यात आले होते. दुसऱ्या बाजूला कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. हे सगळी परिस्थिती असताना दहावी बारावीचे वर्ग सुरु आहेत. तसेच या वर्गांच्या पूर्व परीक्षा काही शाळांमध्ये अजूनही घेतल्या नाहीत. दहावी बारावी बोर्ड परीक्षेची तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा घेवू नका किंवा रद्द करा अशी मागणी सुद्धा काही शिक्षक संघटना करत असताना दिसत आहे.
परंतु नियोजित वेळापत्रकानुसार इयत्ता दहावी आणि बारावी इयत्तांच्या परीक्षा होणार अशी माहिती बोर्डाने दिली आहे. दहावीची बोर्डाची परीक्षा 15 मार्च पासून सुरु होणार असून इयत्ता बारावीची परीक्षा हि 4 मार्च पासून सुरु होणार आहे. दरवर्षी बोर्डाचा पेपर हा सकाळी अकरा वाजता सुरु होतो परंतु या वर्षी सकाळी साडेदहा वाजता प्रत्येक पेपर सुरु होईल. तीन तासांच्या पेपर साठी अर्धा तास तर दोन तासांच्या पेपर साठी 15 मिनिटे यावर्षी विद्यार्थ्यांना जास्त मिळणार आहेत.