येत्या वर्षात 25 टक्के अभ्यासक्रम कमी होणार
येत्या वर्षात 25 टक्के अभ्यासक्रम कमी होणार
गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी पालक आणि शिक्षक वर्गांमध्ये या वर्षाच्या शैक्षणिक वर्षात नेमका किती अभ्यासक्रम कमी होणार यावर चर्चा सुरु होती. परंतु शिक्षणमंत्र्यांनी 25% अभ्यासक्रम कमी होणार असे संकेत देवून या चर्चेला कात्री दिली आहे. कोरोन व्हायरस च्या प्रादुर्भावामुळे अजूनही शाळा सुरु होवू शकल्या नाहीत. या पाश्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी इयत्ता पहिली ते बारावी साठी सुमारे 25% अभ्यासक्रम कमी व्हावा असा प्रस्ताव ‘राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने, शासनाला मान्यतेसाठी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी एनसीइआरटी ने सुद्धा आपला अभ्यासक्रम कमी होणार असे जाहीर केले होते. त्याचबरोबर महाराष्ट्र बोर्डानेसुद्धा येत्या शैक्षणिक वर्षात 25% अभ्यासक्रम कमी होईल असे संकेत दिले आहेत.