शाळा 1 सप्टेंबर पासून सुरु होणार
सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे शाळा सुरु करणे जिकीरीचे झाले होते. दरवर्षी 15 जून पासून शाळा सुरु होतात. परंतु या वर्षीपासून अजूनही शाळा सुरु होऊ शकल्या नाही. विध्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होताना दिसत आहे. परंतु शाळा सुरु झाल्यास आरोग्याचेही तितकेच मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात. म्हणून अजूनपर्यंत शाळा सुरु करण्यास हिरवा कंदील देण्यात आला नव्हता. परंतु येत्या 1 सप्टेंबर पासून शाळा सुरु होतील असे संकेत महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
तीन टप्प्यांमध्ये शाळा सुरु होण्याची शक्यता आहे. यातील पहिल्या टप्प्यात नववी दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करण्यात येतील. तर दुसऱ्या टप्प्यात सहावी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरु होतील तर पहिले ते पाचवीचे वर्ग हे तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात सुरु होण्याची शक्यता आहे.
शाळा आत्ता सुरु नाही झाल्या तर शाळेतील विद्यार्थी संख्या घटण्याची भीती शासनाला आहे तर पालकांना हे शैक्षणिक वर्ष ड्रोप होते कि काय अशी भीती वाटत होती. परंतु 1 सप्टेंबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणार येण्यात असल्यामुळे पालकांची हि भीती दूर होताना दिसत आहे.