4 ऑक्टोबर पासून शाळेची घंटा वाजणार : मार्गदर्शक सूचना काय आहेत जाणून घ्या
ऑक्टोबर पासून शाळेची घंटा वाजणार : मार्गदर्शक सूचना काय आहेत जाणून घ्या
येत्या 4 ऑक्टोबर पासून राज्यात शाळा सुरु करण्य्च्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे. या 4 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील 5 वी ते 12 वी तसेच शहरी भागातील 8 वी ते बारावी पर्यंतच्या वर्ग सुरु होण्याचा निर्णय झाला आहे. शाळा सुरु करण्याच्या संदर्भात काही मार्गदर्शक सुचना जरी करण्यात आल्या आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत.
1. शाळा सुरु करताना शक्य असल्यास शाळेतच वैद्यकीय सेवा सुरु कराव्यात.
2. विद्यार्थ्यांनी शाळेत पायी यावे यासाठी शिक्षकांनी मुलांना प्रोत्साहित करावे.
3. विद्यार्थ्यांचे तापमान नियमितपणे तपासावेत.
4.सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न असाव्यात
5. ज्या शाळांमधील विद्यार्थी बस ने किंवा इतर खाजगी वाहनांनी प्रवास करतात. त्या वाहनांमध्ये शक्यतो एका आसनावर एक विध्यार्थी अशी व्यवस्था करावी.
6. शिक्षकांनी मुलांचा गृहपाठ वर्गात किंवा online घ्यावा.
7. शाळेत कोणतेही खेळ खेळण्यास मनाई असेल.
8. शाळेतून मुलगा घरी आल्यावर त्वरित त्यांचे स्नानगृहात जावे आणि तिथेच गणवेश बदलावा.