दिवाळीपूर्वी शाळा सुरु होणे कठीण
दिवाळीपूर्वी शाळा सुरु होणे कठीण
गेल्या दोन वर्षांपासून शाळांची घंटा काही वाजली नाही. Online शिक्षणाच्या मार्गाने शाळेतील शिक्षण सुरु होते. याचे अनेक चांगले वाईट परिमाण मुलांवर आणि समाजावर होत असताना दिसत आहेत. खरंच सर्वांपर्यंत online शिक्षण पोहचले काय? असा प्रश्न सुद्धा काही तज्ञांकडून विचारला जात आहे. अर्थतज्ञ आणि भारतीय रिझर्व बँकेचे माजी गवर्नर रागुराम राजन यांनी म्हंटले, ‘कोरोनामुळे भारतात सर्वात जास्त गरिबांचे नुकसान झाले आहे. गरीब मुलांना online शिक्षणाचा उपभोगही घेता आला नाही. जर मुलांना दीड वर्ष शाळेपासून दूर ठेवत आहात तर अस समजा की ती तीन वर्ष मागे जातील. मला अशा आहे की सरकार मुलांच्या शाळा सुरु करण्याबाबत विचार करत आहेत, परंतु असे झाले नाही तर एक संपूर्ण पिढी आपण हरवून बसू’
यातच महाराष्ट्रात शाळा कधी सुरु करणार असा सवाल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी विचारला असता अद्याप शाळा सुरु करता येणार नाही तसेच दिवाळीपूर्वी शाळा सुरु होणे कठीण आहे असे त्यांनी सांगितेले. दुसरी लाट ओसरत असली तरी सध्या शाळा सुरु करता येणे कठीण आहे. परंतु ज्या दहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाची स्थिती बरी आहे म्हणजे एकही रुग्ण नाही अशा जिल्ह्यांमध्ये आपण शाळा सुरु करण्याचा विचार करू शकतो