आठवी गणित – प्रकरण 1 ले
आठवी गणित – समांतर रेषा व छेदिका – – नोट्स आणि विडीयो
समांतर रेषा व छेदिका
महत्वाच्या संकल्पना – नोट्स आणि विडीयो
संकल्पना – नोट्स
समांतर रेषा म्हणजे काय?
एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकीना न छेडणाऱ्या रेषांना ‘समांतर रेषा’ असे म्हणतात.
रेषा l व रेषा m त एकमेकींना समांतर असतील तर हे ‘रेषा l || रेषा m असे लिहितात.
छेदिका म्हणजे काय?
जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका असे म्हणतात.
दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोन, व्युत्क्रम कोन, आंतर कोन, यांसारख्या कोणाच्या जोड्या तयार होतात. त्यांच्या व्याख्या खालीलप्रमाणे
संगत कोन – ज्या जोडीतील कोणांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा एकाच बाजूस असतात, ती जोडी संगत कोनांची असते.
आंतर कोन – ज्या जोडीतील कोन दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत व छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत, ती जोडी आंतरकोनाची असते
व्युत्क्रम कोन – ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात, ती जोडी व्युत्क्रम कोनांची जोडी असते.
व्हिडियो
सरावसंच 2.1
सरावसंच 2.2
सरावसंच 2.3