21 सप्टेंबर नाही तर शाळा दिवाळी नंतरच सुरु होणार : शिक्षण मंत्र्यांची माहिती
21 सप्टेंबर नाही तर शाळा दिवाळी नंतरच सुरु होणार : शिक्षण मंत्र्यांची माहिती
शाळा कधी सुरु होणार हा प्रश्न अनेक विध्यार्थी आणि पालकांना खूप दिवसांपासून भेडसावत आहे. जून महिन्यात सुरु होणाऱ्या शाळा अजूनही सुरु नाही झाल्या. शाळा सुरु झाल्यावर संसर्गाची भीती कायम असल्याने शाळा सुरु होण्याची परवानगी अजूनही मिळाली नाही. केंद्रसरकारने नुकतीच अनेक संस्थाचालक मंडळांची बैठक घेतली होती. या बैठकीत 21 सप्टेंबरपासून शाळा सुरु करता येतील काय यावर चर्चा करण्यात आली. शेवटी अनेक संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास नकार दर्शवला आहे. त्यामुळे दिवाळी नंतरच शाळा सुरु करण्यात येतील
राज्यात 21 सप्टेंबर पासून नववी ते बारावी चे वर्ग नियमित सरू करावेत असे निर्देश केंद्र शासनाने दिले होते. परंतु या 21 तारखेपासून शाळा सुरु करणे योग्य नाही असे संस्थाचालाकांसोबत झालेल्या बैठकीत ठरले. त्यामुळे नववी ते बारावी आणि इतर वर्ग हे दिवाळी नंतरच सुरु होईल असे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केले.