महात्मा जोतिबा फुले
महाराष्ट्रातील बहुजन समाजात जागृती निर्माण करून बहुजन समाजाला न्याय्य हक्कासाठी संघर्ष करण्यास प्रवृत्त करणारा ‘पहिला महापुरुष’ म्हणून महात्मा जोतिबा फुले यांचा उल्लेख करावा लागेल. महात्मा फुले हे केवळ एक व्यक्ति नव्हते तर सामाजिक आणि संस्कृतिक परिवर्तनाचा तो एक महान विचार होता.