मराठी भाषेला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा
मराठी भाषेला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा | अभिजात भाषा म्हणजे काय? तो दर्जा कसा मिळतोय?
संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हंटले आहे की ‘माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके’ अमृताठी पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नव्हता शेवटी आज दिनांक ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाची बाब आहे.
अभिजात भाषेचा दर्जा (Classical Language) मिळवण्यासाठी चार निकष लावले जातात
1) संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावा.
2) या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्वाचे, मौल्यवान असावे.
3) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
4) प्राचीन भाषेचे स्वरुप हे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?
1) अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
2) अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येतं.
3) प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.
आज कोणकोणत्या भाषांना हा दर्जा मिळाला?
मराठीबरोबरच पाली, प्राकृत, असामी, आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
याआधी कोणकोणत्या भाषांना हा दर्जा मिळाला आहे
तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.