महेंद्र सिंह धोनी
भारताचा माजी कर्णधार आणि प्रसिस्द यष्टीरक्षक महेंद्र सिंह धोनी याने नुकतीच क्रिकेट मधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिनाच्या दिवशी आपल्या चाहत्यांना हि बातमी त्याने दिली. या भारतीय क्रिकेट विश्वातील ताऱ्याबद्दल जाणून घेवूयात
महेंद्र सिंह धोनी याचा जन्म छत्तीसगड मधील रांची येथे 7 जुलै 1981 मध्ये झाला. 350 एकदिवसीय सामने खेळणाऱ्या धोनीने 23 डिसेंबर 2004 मध्ये बांगलादेश विरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. या पहिल्याच सामन्यात धोनी धावबाद झाला होता. आणखी महत्वाची गोष्ट अशी कि धीनी आपल्या शेवटच्या सामन्यातही धावबाद झाला होता.
2 डिसेंबर 2005 रोजी श्रीलंका विरुद्ध कसोटी सामन्यात महेंद्र सिंह धीनी याने पदार्पण केले होते. 20-20 सामन्यात 1 डिसेंबर 2006 रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध पदार्पण केले होते.
महेंद्र सिंह धोनी याने आजपर्यंत 350 एकदिवसीय सामने, 90 कसोटी सामने, 98 टी – 20 सामने खेळले असून आय पी एल मध्ये 190 सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे.
महेंद्र सिंह धोनी याच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये पहिला 20-20 विश्वचषक जिंकला होता तर 2011 साली आपल्या देशाने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.
महेंद्र सिंह धोनी याच्या आयुष्यावर नुकताच एक चित्रपट येवून गेला होता. यात सुशांत सिंह राजपूत याने धोनीची भूमीका केली होती.