आता शनिवार आणि रविवारी देखील शाळा सुरु ठेवा – अजित पवार
आता शनिवार आणि रविवारी देखी शाळा सुरु ठेवून मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण करा असे आवाहन महराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात केले.
गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आता प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्या आहेत परंतु विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर उभे राहिले आहे. या पाश्वभूमीवर आता शनिवार आणि रविवारी शाळा सुरु ठेवून मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा असे आवाहन महाराष्ट्रातील शिक्षकांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रमाच्या पारितोषिक वितारण कार्यक्रमात बोलत असताना अजित पवारांनी हे आवाहन केलं.
“जवळपास पावणेदोन वर्ष मुलांची वाया गेलेली आहे. आता ती भर आपल्याला काढायची आहे शाळा सुरु झाल्यानंतर थोडंस शिक्षक वर्गाने सहकार्य करावं. शनिवारी – रविवारी शाळांना सुट्ट्या देवू नये. शनिवारी आणि रविवारी वर्ग चालू ठेवून काही प्रमाणामध्ये मुलांचा अभ्यासक्रम भरून काढावा” – अजित पवार