पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात 25% कपात | इथून करा PDF डाऊनलोड
पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात 25% कपात | इथून करा PDF डाऊनलोड
मागील वर्षी वर्ष 2020 – 21 मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षण ऑनलाईन सुरु झाले. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालये वेळेवर सुरु होऊ शकली नाही. त्यामुळे महारष्ट्र बोर्डाकडून पहिले ते दहावी पर्यंतच्या सर्व वर्गांचा अभ्यासक्रम 25% कमी केला होता. यावर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष 2021 – 22 करिता सुद्धा मागील वर्षीप्रमाणे 25% अभ्यासक्रम कपात करण्यात आलेला आहे.
मागील वर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष 2020 – 21 साठी जो अभ्यासक्रम कमी करण्यात आला होता तोच अभ्यासक्रम यावर्षी म्हणजे 2021 – 22 करिता सुद्धा कमी करण्यात आलेला आहे.
15 जुलै पासून राज्यात शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. त्या अनुषंगाने सर्व शाळा आणि महाविद्यालये सध्या तरी ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचा गाडा हाकत आहेत. ऑनलाईन शिक्षण घेत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने मागील वर्षी अशाप्रकारे अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला होता.
हा कमी झालेला अभ्यासक्रम तुम्ही महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र च्या संकेतस्थळावर पाहू शकता. या वेबसाईट ची लिंक खालीलप्रमाणे आहे.
कमी झालेल्या अभ्यासक्रमाच्या PDF डाऊनलोड करण्याच्या पायऱ्या
1) सर्वात आधील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र च्या संकेतस्थळावर https://www.maa.ac.in/ लिंक वर क्लिक करून जावे.
2) यानंतर या वेबसाईट वर आल्यावर useful लिंक या नावासमोर क्लिक करणे
3) तुमच्या इयत्तांच्या PDF लिंक ची नावे समोर दिसतील. यापैकी तुम्हाला आवश्यक असणाऱ्या लिंक डाउनलोड करा.