लिखाणाचा स्पीड कसा वाढवावा? लिहिण्याचा वेग वाढवायचा कसा? How to improve writing speed?
लिखाणाचा स्पीड कसा वाढवावा? लिहिण्याचा वेग वाढवायचा कसा? How to improve writing speed?
मित्रांनो आपण वर्षभर खूप सारा अभ्यास करतो. मोठमोठ्या प्रश्नांची उत्तरे पाठ करतो. तुमचा अभ्यास 100 टक्के झालेला असतो. परंतु तरीही आपल्याला 100 टक्के गुण का मिळत नाहीत. कारण बऱ्याचदा आपण आपल्या लिखाणाच्या स्पीड मुळे मागे रहातो. बऱ्याचदा आपला संपूर्ण पेपर लिहून होत नाही. खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे लिहियाची राहून जातात. उत्तरे येत असतात परंतु आपण लिहू शकत नाही. आपल्याला वेळच पुरत नाही कारण आपण लिहित असतो कासवाच्या गतीने. या कासवाच्या गतीला सशाच्या गतीत कसं आणायचं म्हणजे लिहिण्याचा स्पीड आपण कसा वाढवायचा यावर आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी खालील मुद्दे लक्षात ठेवा.
1) आपण वापरत असलेला पेन –
मित्रांनो आपल्या लिखाणाच्या स्पीड वर आपण वापरत असलेला पेन खूप महत्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे आपण पेपर लिहिण्यासाठी योग्य पेन निवडावा. पेन दिसतो कसा हे महत्वाचे नाही तर त्याने लिहिता कसे आणि किती वेगाने आपण लिहू शकतो हे महत्वाचे आहे. त्यामुळे शक्यतो हलक्या वजनाचा पेन आपण वापरावा. जड वजनाचा पेन वापरल्यामुळे आपल्या लिखाणाचा स्पीड कमी होतो तसेच काही वेळाने आपले हात सुद्धा दुखतात, त्यामुळे आपण लिहिताना नेहमी हलक्या वजनाचा ball पेन वापरावा. पेन जास्त जाड पण नको आणि जास्त पातळ पण नको तुमच्या हातात योग्यरित्या फिट बसेल असा पेन वापरा.
2) लिहिताना पेनाचे टोपण पेनाच्या मागे लावू नये –
बरेच विद्यार्थी पेपर लिहिताना किंवा गृहपाठ करताना अथवा काहीही लिहिताना पेनाचे टोपण पेनाच्या मागच्या बाजूला लावून ठेवतात. त्यामुळे त्या टोपणाच्या अतिरिक्त वजनाने सुद्धा आपला लिहिण्याचा स्पीड कमी होऊ शकतो. म्हणून काहीही लिहिताना पेनाचे टोपण शक्यतो पेनाच्या मागे लावू नका.
3) पेनाची ग्रिप योग्य असावी –
बऱ्याचदा आपण खूप सारं लिहितो तेव्हा आपल्या बोटांना घाम येतो त्यामुळे पेन पकडताना अडचण निर्माण होते. म्हणून शक्यतो पेनाची ग्रीप उत्तम असावी.
4) प्रक्टिस खूप महत्वाची –
मित्रांनो आपण एखाद्या प्रश्नांचे उत्तर पाठ केल्यावर वारंवार थे आठवण्याचा प्रयत्न करून सराव करतो. तसेच आपण लिखाणाचा सुद्धा रोज सराव करावा. जेणेकरून आपल्या लिखाणाचा स्पीड वाढेल.
5) पेन पकडताना आणि लिहिताना जास्त जोर देवू नये –
काही मुले पेन खूप घट्ट पकडतात तर काही मुले वहीवर खूप जास्त दाब देवून लिहितात. तर असे करू नये यामुळे सुद्धा आपल्या लिखाणाचा वेग कमी होतो. त्यामुळे पेन हलक्या हाताने पकडून आणि हलक्या हातानेच लिहिण्याचा प्रयत्न करावा.
6) वर्षभर आणि परीक्षेला एकच पेन वापरा –
बऱ्याचदा आपण वर्षभर एखादा पेन वापरतो आणि ऐन परीक्षेच्या वेळी आपल्याला कोणीतरी एखादा पेन भेट म्हणून देतो आणि आपण त्या नवीन पेनाने लिहितो. परंतु शक्यतो असे करू नये. आपण वर्षभर जो पेन वापरतो तोच पेन परीक्षेला वापरावा.